मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील रस्ते धुण्यास प्रारंभ !

हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी घेतला निर्णय

मुंबई – मुंबई महानगरपालिका प्रशासनाने येथील सर्व प्रमुख रस्ते पाण्याने धुण्याचा निर्णय घेतला आहे. ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुण्यास प्रारंभ झाला आहे. यानुसार आता ६५० किमी लांबीचे रस्ते नियमितपणे धुण्यात येतील. मुंबईतील हवेचे प्रदूषण आणि धुळीचे नियंत्रण यांसाठी महापालिकेने उपाययोजना काढण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही हवेच्या प्रदूषणावरून फटकारले होते. या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महानगरात ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करण्यात येतील. त्यासाठी पाण्याचे १२१ टँकर आणि इतर संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. जिथे वाहने आणि नागरिक यांची अधिक वर्दळ असते, तेथे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

 ‘आग रामेश्‍वरी, बंब सोमेश्‍वरी’ वृत्तीचे प्रशासन !