Meerut Gharvapasi :  मेरठ (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या ३० कुटुंबांनी केला हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

आमीष दाखवून धर्मांतर करणार्‍या पाद्री बिज्जू मॅथ्यू याला अटक !

 

वैदिक विधीपूर्वक हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले ३० कुटुंबांतील १५० लोक स्वगृही परतले आहेत. १० नोव्हेंबर या दिवशी झालेल्या एका समारंभात या लोकांना पूर्ण वैदिक विधीपूर्वक हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. या सर्वांचे काही दिवसांपूर्वी पाद्री बिज्जू मॅथ्यू याने आमीष दाखवून धर्मांतर केले होते. या प्रकरणी पाद्री बिज्जू मॅथ्यू याला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. (समाजसेवेच्या नावाखाली गरीब हिंदूंना विविध आमीष दाखवून त्यांचे ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर करणार्‍यांच्या विरोधात सरकारने कठोर कारवाई करावी, हीच अपेक्षा ! – संपादक)

पाद्य्राने आतापर्यंत केले ३०० कुटुंबांचे हिंदूंचे धर्मांतर  

केरळचा रहिवासी असलेल्या बिज्जू मॅथ्यू याने चौकशीच्या वेळी पोलिसांना सांगितले की, त्याने अनुमाने ३०० कुटुंबांचे धर्मांतर केले आहे. या लोकांना तो पैसे, विवाह, शिक्षण आणि विनामूल्य औषधोपचार यांचे आमीष दाखवत असे. तो जवळच्या गावांमध्ये जायचा आणि गरिबांच्या घरी जाऊन त्यांना विविध प्रकारची प्रलोभने द्यायचा अन् त्यांना प्रार्थनासभेला येण्यास सांगत असे. बिज्जू आणि त्याची पत्नी गरीब लोकांचे धर्मांतर करण्यासाठी त्यांचा बुद्धीभेद करायचे. यानंतर धर्मांतरित व्यक्तीला अधिक लोकांना प्रार्थनासभेत घेऊन येण्यास सांगत असे. तो धर्मांतराचे जाळे चालवायचा. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहे.

 

संपादकीय भूमिका

देशात अद्यापही कठोर धर्मांतरविरोधी कायदा न केल्याचाच लाभ ख्रिस्ती मिशनरी घेत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !