|
कल्याण – येथील ऐतिहासिक दुर्गाडी गड बनावट कागदपत्रे बनवून सुयश शिर्के (सातवाहन) यांनी स्वतःच्या नावावर करून घेतला. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुयश हे माळशेज, नाणेघाट आणि इतर वनक्षेत्र, तसेच पर्यटक स्थळ विकास समितीचे अध्यक्ष आहेत.
१. ‘बंटी-बबली’ हिंदी चित्रपटात बनावट कागदपत्रे बनवून ‘ताजमहल’ स्वतःच्या नावाने विक्री करण्याचा प्रसंग दाखवण्यात आला होता. असाच प्रकार कल्याण येथे करण्यात आला. दुर्गाडी गडाच्या जागेचे वंशज असल्याचे सुयश यांनी दाखवले.
२. गड नावावर केला; पण जागा विक्री होण्यापूर्वीच हा प्रकार कल्याण मंडळ अधिकारी असलेल्या महिला अधिकारी प्रीती घुडे यांच्यामुळे उघडकीस आला.
३. सुयश शिर्के यांनी १२ सप्टेंबर २०२२ या दिवशी गडाची जागा नावावर करण्यासाठी ‘ना हरकत’ दाखल्यासाठी अर्ज दिला होता. त्यात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करून कल्याण तहसील कार्यालयातील ५ ते ७ कागदपत्रांवर शिक्के आणि अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या असलेली कागदपत्रे अर्जासह जोडली होती. या जागेचे प्रकरण ऐतिहासिक गडाविषयी असल्याने संमतीसाठी जिल्हाधिकारी कार्यलयात पाठवण्यात आले होते.
४. गडाची पडझड झाल्याने दुरुस्तीसाठी स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करून गडाविषयी लेखी माहिती मागवली. तेव्हा ही जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने ‘त्यांच्याकडून दुरुस्तीची अनुमती द्यावी’, असे पोलिसांना सांगण्यात आले.
५. कल्याण मंडळ अधिकारी कार्यलयात गडाच्या जागेविषयी २४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी कागदपत्रे तपासणीच्या काळात कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट पत्रासह अधिकार्यांच्या स्वाक्षर्या असलेली कागदपत्रे आढळून आली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.
६. २ नोव्हेंबर या दिवशी कल्याण तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रीती घोडे यांच्या तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
संपादकीय भूमिकाऐतिहासिक वास्तूच्या संदर्भात प्रशासनाची अशा प्रकारे फसवणूक करणार्यांना कठोरात कठोर शिक्षाच करायला हवी ! |