
पुणे – प्रेम प्रकरणातून छत्तीसगढ येथून मित्रासमवेत पळून आलेल्या अल्पवयीन मुलीवर रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार आणि त्याच्या साथीदाराने बलात्कार केला आहे. या प्रकरणी हवालदाराचा साथीदार उत्तरप्रदेश येथील रहिवासी कमलेश तिवारी याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी कह्यात घेतले आहे. रेल्वे सुरक्षा दलातील हवालदार अनिल पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पवार पळून गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अल्पवयीन मुलीने पुणे रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड आणि पथकाने अन्वेषण करून तिवारीला कह्यात घेतले. लोहमार्ग पोलीस दलातील उपविभागीय अधिकारी देवीकर पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका :
|
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद