सिंधुदुर्ग : कलमठ येथील शिक्षिकेची ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक !

वाढदिवसासाठी भेट पाठवल्याचे सांगून एका शिक्षिकेची ३८ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग : नरकासुर प्रतिमा स्पर्धेवर बंदी घालण्याची वेंगुर्ला येथील नागरिकांची मागणी

भगवान श्रीकृष्णाच्या ऐवजी नरकासुररूपी दैत्यालाच देव करणार्‍या आणि प्रतिवर्षी वाढत चाललेल्या ‘नरकासुर प्रतिमा स्पर्धा’ या विकृतीला आमचा विरोध आहे. या ‘विकृत आणि विद्रूप’ स्पर्धेवर बंदी घालावी आणि संस्कृती अन् तरुण पिढी यांना वाचवावे.

गोवा सरकार संस्कृत पाठशाळा आणि केंद्रे यांना अनुदान देणार !

गोव्यात प्रत्येकी ३ संस्कृत पाठशाळा आणि संस्कृत केंद्रे आहेत. या योजनेच्या अंतर्गत सरकार संबंधित संस्थांना १०० टक्के वेतन अनुदान, तसेच पाठशाळेसाठी वार्षिक देखभाल खर्च ५ लाख रुपये आणि संस्कृत केंद्रासाठी १ लाख रुपये देण्यात येणार आहे.

गोवंशियांच्या मांसाची विक्री करणारे दोघे अटकेत ! 

त्यांच्याकडून ८ सहस्र रुपये किमतीचे ८० किलो गोवंशियांचे मांस, ५०० रुपये किमतीची कुर्‍हाड आणि सुरी असा एकूण १० सहस्र ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

खोटे बोलून २ कोटी रुपयांची फसवणूक ! 

व्यवसायासाठी कर्ज मिळत नसल्याने २० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देणार असल्याचे सांगितले आणि कर्ज संमतीसाठी एका व्यक्तीकडून २ कोटी रुपये मागितले; पण कर्ज दिलेच नाही.

उघड्या गटारांमुळे ९५ पादचार्‍यांचा मृत्यू ! 

पदपथावरील अतिक्रमणे हटवण्याचे प्रयत्न केले जातात; पण उघडी झाकणे यांकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष होते. 

कराड येथे झालेल्या स्फोटातील घायाळांपैकी दोघांचा मृत्यू !

मुल्ला यांच्या घरात झालेला स्फोट गॅस गळतीमुळे झाल्याचे प्राथमिक कारण पोलीस सांगत आहेत. स्फोटाचे कारण अद्याप प्रशासनाने सांगितले नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे.

इंग्रजीच्या तुलनेत संस्कृतचे श्रेष्ठत्व !

‘इंग्रजी भाषा चांगली शिकल्याने केवळ चांगली नोकरी मिळू शकते, तर संस्कृत भाषा शिकल्यामुळे अध्यात्मातील सर्वोच्च ज्ञान आणि देवही मिळू शकतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तारखांवर तारखा !

देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ‘मला सर्वाेच्च न्यायालयाला ‘तारखांवर तारखा देणारे न्यायालय’ बनवायचे नाही’, अशा शब्दांत अधिवक्त्यांना फटकारले. यावरून आजही स्थिती काही वेगळी नाही, हेच स्पष्ट होते. यामागे विविध कारणे आहेत. त्याचा अभ्यासही झाला आहे.

भारतातील किती हिंदु खेळाडू हिंदूंवरील अत्याचारांविषयी बोलतात ?

‘गाझावरील आक्रमणात ठार झालेल्या मुलांविषयी जग शांत आहे’, असे ट्वीट भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने केल्यावर पाकचा हिंदु धर्मीय माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने पठाण याला पाकमधील हिंदूंविषयी बोलण्याचे आवाहन केले.