(म्हणे) ‘१९ नोव्हेंबरला विमानातून प्रवास करणार्‍यांच्या जिवाला धोका असेल !’ – खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

अमेरिकेत राहून अशा प्रकारच्या धमक्या देऊन प्रसिद्धीत रहाणार्‍या पन्नूला भारताच्या कह्यात देण्याची मागणी अमेरिकेकडे का केली जात नाही ?

Jaishankar Diplomacy : भारत-कॅनडा वाद सोडवण्यासाठी अजूनही कूटनैतिक चर्चेला वाव ! – परराष्ट्र मंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद सोडवण्यासाठी अजूनही कूटनैतिक चर्चेला वाव आहे. सार्वभौमत्व आणि संवेदनशीलता केवळ एका बाजूने असून चालत नाही. दोन्ही देश एकमेकांच्या संपर्कात असून यावर योग्य उपाय काढण्यात येईल, अशी आशा आहे, असे वक्तव्य भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.

जगातील तथाकथित नेते गाझातील नरसंहाराचे समर्थन करत आहेत  ! – प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

‘जगभरातील इस्लामी नेते इस्रायलच्या दीड सहस्र नागरिकांच्या हत्यांविषयी, हमासने पकडलेल्या ओलिसांविषयी मौन बाळगून का आहेत ?’, असे प्रियांका गांधी का विचारत नाहीत ?

ओटावामध्ये ‘स्वस्तिका’चे चित्रण अस्वीकारार्ह आहे ! – जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा

भारत आणि पर्यायाने हिंदूंचा द्वेष करणारे जस्टिन ट्रुडो यांच्या हिंदुद्वेषी विचारांचे खंडण करण्याची आवश्यकता आहे. एका सार्वभौम प्रगत राष्ट्राचे प्रमुख एका प्रमुख धर्माच्या धार्मिक चिन्हाचा अवमान करत असल्याने जगभरातील हिंदूंनी त्यांना वैध मार्गाने जाब विचारणे आवश्यक !

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर !

चांगल्या गोष्टींसाठी नाही, तर वाईट गोष्टींसाठीच भारताची राजधानी सर्वांत पुढे असते, हे लज्जास्पद ! याला सर्वपक्षीय शासनकर्ते, प्रशासन आणि जनता उत्तरदायी आहे !

ल्यॉन (फ्रान्स) येथे एका महिलेवर आक्रमण करून आक्रमणकर्त्याने दरवाज्यावर रंगवले ‘हेकेन क्रूझ’ !

हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांचा निषेध करावा तेवढा थोडा !

गाझा पट्टीतील निर्वासित छावणीवर इस्रायलने केलेल्या आक्रमणात ५१ पॅलेस्टिनी ठार !

इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल आक्रमणात गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असतांनाही हमासकडून २४० ओलिसांची सुटका करण्यात येत नाही. यावरून हमासला जगाच्या पटलावर इस्रायलला ‘अमानुष’ ठरवायचे आहे, असेच लक्षात येते.

इस्रोचे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी स्थगित केले आत्मचरित्राचे प्रकाशन !

इस्रोचे अध्यक्ष ए. सोमनाथ यांचे ‘निलावू कुडीचा सिंहगल’ (चंद्र प्यायलेला सिंह) हे मल्याळम् भाषेतील आत्मचरित्र पुढच्या आठवड्यात प्रकाशित होणार होते; मात्र हे प्रकाशन त्यांनी स्थगित केले आहे.

पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी स्वत:ला देव समजतात ! – गुजरात उच्च न्यायालय

न्यायालयांनी जनताद्रोही पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना फटकारून न थांबता त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !

सिंधुदुर्ग : कणकवली येथे एकतर्फी प्रेमातून युवतीला जाळण्याचा प्रयत्न !

चित्रपटांत दाखवतात त्या एकतर्फी प्रेमाच्या कथा काल्पनिक असतात आणि वास्तव निराळे असते एवढेही युवकांना समजत नाही का ?