कोयना धरण परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा !

कोयना धरण म्‍हणजेच शिवसागर जलाशयाच्‍या परिसरात पर्यटन विकासाला चालना मिळण्‍यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘शासकीय गुपिते कायदा १९२३’मध्‍ये अंशतः पालट करण्‍यात आला आहे.

मागण्‍या किंवा तक्रार यांच्‍यावर पुढील कार्यवाहीच नाही !

नागरिकांच्‍या समस्‍या सोडवू न शकणारे प्रशासन काय कामाचे ?

सिंधुदुर्ग : सावंतवाडीच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांना लाच स्वीकारतांना पकडले 

फसवणूक करणार्‍याला लाच घेऊन साहाय्य करणारे पोलीस जनतेचे शत्रूच !

गोवा : कळंगुट पोलिसांची अनधिकृत दलालांवर कारवाई 

अनेक वेळा अनधिकृत दलालांवर कारवाई होऊनही हे प्रकार का थांबत नाहीत, याचा प्रशासनाने शोध घ्यावा ! पकडलेले दलाल दंड भरून सुटका झाल्यानंतर पुन्हा तोच प्रकार करत असावेत. यामुळे त्यांना धाक बसेल अशी शिक्षा केली पाहिजे !

गोवा : शंखवाळ येथे वारसा स्थळी देवीची मूर्ती स्थापन केल्याच्या प्रकरणी पोलीस हवालदार आहे तक्रारदार !

एका पोलीस हवालदाराच्या नावाने तक्रार करण्यात आलेली आहे. यामुळे पोलीस हवालदाराला बळीचा बकरा बनवला जात आहे का ? असा प्रश्न भक्तगणांना पडला आहे. 

सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे झाराप येथील शाळेत शिक्षक देणे अशक्य !

सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! आंदोलन केल्यानंतरच समस्येवर उपाययोजना काढणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंग्रजी फलकांना काळे फासण्याची मनसेची चेतावणी !

स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांत नागरिकांत स्वभाषा आणि स्वधर्म यांविषयीचा अभिमान निर्माण न केल्यानेच सर्वत्र इंग्रजीकरण झाले आहे. स्वभाषा आणि स्वधर्म यांविषयी अभिमान नसलेल्या नागरिकांत राष्ट्राभिमानही निर्माण होत नाही, हे जाणा !

विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद !

विज्ञानाने स्वार्थीपणा वाढू शकतो, तर अध्यात्मात साधनेने स्वार्थीपणा नाहीसा होतो – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

खैबरखिंडीत दुर्ग अभ्‍यासक अधिवक्‍ता मारुति गोळे यांनी भगवा ध्‍वज फडकावला !

पुरातन व्‍यापारी मार्गासह भारताच्‍या इतिहासात आक्रमकांची वाट म्‍हणून जिच्‍याकडे पाहिले जाते, त्‍या अफगाणिस्‍तान-पाक सीमेवरील खैबरखिंडीत दुर्ग अभ्‍यासक अधिवक्‍ता मारुति गोळे यांनी भगवा ध्‍वज फडकावला. पिरंगुट (ता. मुळशी) येथील गोळे सध्‍या अफगाणिस्‍तान येथे दुर्ग मोहिमेवर आहेत.