सावंतवाडी : एका बांधकाम व्यावसायिकाकडून १ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना सावंतवाडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना रायगड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यातच कह्यात घेतले. या प्रकरणात अन्य काही अधिकारी आणि कर्मचारी यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शहरातील एका बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी साहाय्य करण्यासाठी खंडागळे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार संबंधित बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. (फसवणूक करणार्याला लाच घेऊन साहाय्य करणारे पोलीस जनतेचे शत्रूच ! – संपादक) त्यानुसार पथकाने १२ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी सापळा रचून सावंतवाडी पोलीस ठाण्यातच खंडागळे यांना रक्कम स्वीकारतांना कह्यात घेतले. ही कारवाई ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे आणि उपअधीक्षक अनिल गेर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.