मागण्‍या किंवा तक्रार यांच्‍यावर पुढील कार्यवाहीच नाही !

अमरावती जिल्‍हाधिकारी कार्यालयाची निष्‍क्रीयता !

अमरावती – येथील नागरिक आणि संघटना विविध मागण्‍या अन् तक्रार यांची निवेदने घेऊन जिल्‍हाधिकारी कार्यालयात येतात. जिल्‍हाधिकारी किंवा निवासी उपजिल्‍हाधिकारी ही निवेदने स्‍वीकारून निवेदक-आंदोलक यांच्‍याशी चर्चा करतात; परंतु आलेले निवेदन किंवा तक्रार केवळ संबंधित विभागांना पाठवण्‍यापलीकडे काहीच होत नाही’, असा आरोप निवेदनकर्ते करत आहेत.

संपादकीय भूमिका 

नागरिकांच्‍या समस्‍या सोडवू न शकणारे प्रशासन काय कामाचे ?