सांगली – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चात भाजपसह विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना सहभागी होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी धारकर्यांसह मोर्चात सहभागी होते. मोर्चा झाल्यावर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
सौजन्य टीव्ही ९ मराठी
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात मराठा तरुणांच्या शैक्षणिक अडचणी आणि वसतीगृहाचे प्रश्न सोडवा, अण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम बनवून तरुणांना येणार्या अडचणी सोडवा, सारथी संस्थेला मनुष्यबळ अन् वाढीव निधी देऊन सर्व योजना चालू करा, यांसह अन्य मागण्यांचा समावेश आहे.