मराठा आरक्षणाविषयी न्‍यायालयीन प्रक्रियेची माहिती देण्‍यासाठी शंभूराज देसाई यांनी घेतली उदयनराजे यांची भेट !

खासदार उदयनराजे भोसले म्‍हणाले, ‘‘आज मराठा समाजाची अवस्‍था वाईट आहे. जे लोक मराठा समाजाचे राजकारण करतात. त्‍यांनी इतके वर्ष आरक्षण का दिले नाही

मीरारोड (जिल्‍हा पालघर) येथे पोलिसावर आक्रमण करून आरोपीचे पलायन !

सामान्‍य आरोपींना सांभाळू न शकणारे पोलीस कुख्‍यात गुंडांना कसे सामोरे जाणार ?

उदयनिधी स्‍टॅलिन यांना महाराष्‍ट्रात पाय ठेवू देऊ नका ! – मंगल प्रभात लोढा, मंत्री

श्री लोढा म्हणाले, सनातन धर्माविषयी बेताल वक्‍तव्‍य करून लाखो लोकांच्‍या भावना दुखावण्‍याचा उदयनिधी स्‍टॅलिन यांना काय अधिकार ? त्‍यांच्‍या द्वेष पसरवणार्‍या वक्‍तव्‍यामुळे महाराष्‍ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही.

महाराष्‍ट्रात ५ सप्‍टेंबरपासून पाऊस !

बंगालच्‍या उपसागरात अल्‍प दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन महाराष्‍ट्रात ५ सप्‍टेंबरपासून पाऊस पडेल, अशी शक्‍यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत हवाईसुंदरीची गळा चिरून हत्‍या !

तिचा मृतदेह तिच्‍याच घरात आढळला असून या प्रकरणी स्‍वच्‍छता कर्मचार्‍याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

जालना येथील आंदोलकांवर झालेल्‍या लाठीमाराच्‍या निषेधार्थ आज कोल्‍हापूर बंद !

जालना येथे आंदोलकांवर झालेल्‍या लाठीमाराचा निषेध करण्‍यासाठी सकल मराठा समाजाच्‍या वतीने ५ सप्‍टेंबरला कोल्‍हापूर बंदची हाक देण्‍यात आली आहे.

सातारा बंदला समाजातून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

मराठा क्रांती मोर्चाच्‍या वतीने शिवतीर्थावरील (पोवई नाक्‍यावरील) छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पूर्णाकृती मूर्तीस पुष्‍पहार घालून अभिवादन करण्‍यात आले. नंतर जिजाऊ वंदना घेण्‍यात आली.

सरकारने आरक्षणाचा अध्‍यादेश आणावा,अन्‍यथा आजपासून पाणी सोडणार ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे म्‍हणाले की, विनाकारण केवळ बैठकांचे दरवाजे खुले आणि चर्चेचे गुर्‍हाळ हे आता आरक्षणासाठी लढणार्‍या पिढीला अपेक्षित नाही. सरकारने काही सकारात्‍मक निर्णय घेतले असतील, तर त्‍यांचे लोक येऊन सांगतील.

वैज्ञानिकांचे संशोधन आणि ऋषीमुनींचे ज्ञान यांतील भेद !

ऋषिमुनींना सूक्ष्मातून मिळणार्‍या ज्ञानामुळे संशोधन करावे न लागता क्षणात सूक्ष्मातीसूक्ष्म सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि ती अंतिम सत्य असल्यामुळे कोणाला त्यांत पालट करता येत नाहीत.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सांस्‍कृतिक प्रदर्शनात भारताकडून ‘ऋग्‍वेद’ आणि महर्षि ‘पाणिनी’ यांच्‍या ‘अष्‍टाध्‍यायी’चे हस्‍तलिखित !

राजावर नियंत्रण ठेवणारी सामान्‍य लोकांची ‘समिती’ आणि तज्ञांची ‘सभा’ या २ आद्य लोकशाही संस्‍थांचा उल्लेख ‘ऋग्‍वेदा’मध्‍ये आढळतो. त्‍या अर्थाने ‘ऋग्‍वेद’ हा लोकशाहीचा आद्य उद़्‍गार आहे’, असे म्‍हणता येईल.