संभाजीनगर येथे तरुणाने स्‍वत:चीच दुचाकी पेटवली !

गोळेगाव येथील मराठा मोर्चा समन्‍वय समितीचे कार्यकर्ते अनिल पाटील बनकर यांनी शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ४ सप्‍टेंबर या दिवशी स्‍वतःची दुचाकी पेटवून दिली, तसेच महाराष्‍ट्र सरकारचा निषेध करत मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांच्‍या विरोधात घोषणा दिल्‍या.

पुणे येथून मराठवाड्याकडे जाणार्‍या ६०० पेक्षा अधिक बसगाड्या रहित !

जालना येथील अंतरवाली सराठी गावात ‘मराठा क्रांती मोर्चा’वर पोलिसांकडून केलेल्‍या लाठीमाराचे पडसाद महाराष्‍ट्रभर उमटत आहेत. अनेक ठिकाणी राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या बसगाड्या पेटवण्‍यात, तसेच फोडण्‍यात आल्‍या आहेत.

जालन्‍यातील आंदोलनामुळे एस्.टी. महामंडळाचे ४६ आगार पूर्णत: बंद !

आंदोलनाच्‍या वेळी सर्वसामान्‍यांची प्रवासात होणारी आणि अन्‍य गैरसोय टाळण्‍यासाठी आवश्‍यक उपाययोजना काढाव्‍यात !

लाठीमाराचा आदेश मंत्रालयातून दिला नाही ! – फडणवीस

पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पातळीवर लाठीमार करण्‍याचा अधिकार असतो. मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍यांवर लाठीमार करण्‍याचा आदेश मंत्रालयातून देण्‍यात आलेला नाही, असे स्‍पष्‍टीकरण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

गृहमंत्री फडणवीस यांचे त्‍यागपत्र घ्‍या ! – उद्धव ठाकरे

‘मराठा क्रांती मोर्चा’तील आंदोलक लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. हे आंदोलक आतंकवादी नाहीत. ते शांततेच्‍या मार्गाने उपोषण करत होते. त्‍यांच्‍यावर या सरकारने अमानुषपणे पोलिसांच्‍या साहाय्‍याने लाठीमार केला.

पुणे येथे अनधिकृत शाळा चालवणारे संस्‍थाचालक आणि मुख्‍याध्‍यापक यांसह तिघांविरोधात गुन्‍हा नोंद !

१५८ विद्यार्थ्‍यांना अवैधरित्‍या प्रवेश दिला जात असतांना शिक्षण विभाग काय झोपा काढत होता का ?

पुणे येथे १ सहस्र ७०० वाहनचालकांचा दंड ‘लोक अदालती’द्वारे न्‍यून !

प्रलंबित खटले तडजोडीने संपवणे, थकीत दंडाची रक्‍कम अल्‍प करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करणे यांसाठी पोलिसांची पथके सिद्ध आहेत.

‘चांदणी चौका’चा फेरा ?

जुन्‍या रस्‍त्‍याला काढून ३९७ कोटी रुपये खर्च करून ८ रॅम्‍प, २ सेवा रस्‍ते, २ भूमीगत मार्ग, ४ पूल, १७ कि.मी. रस्‍ते असे त्‍याचे मोठे विस्‍तारीकरण करण्‍यात आले आहे.

काँग्रेसवाल्‍यांचा हिंदुद्वेष जाणा !

‘जो धर्म तुम्‍हाला समान अधिकार देत नाही, तो धर्म एखाद्या रोगाप्रमाणे आहे’, अशी हिंदु धर्मावर अप्रत्‍यक्ष टीका काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी उदयनिधी स्‍टॅलिन यांच्‍या विधानावरून केली.