महाराष्‍ट्रात ५ सप्‍टेंबरपासून पाऊस !

हवामान विभागाचे अनुमान !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – बंगालच्‍या उपसागरात अल्‍प दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन महाराष्‍ट्रात ५ सप्‍टेंबरपासून पाऊस पडेल, अशी शक्‍यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. शेतीसाठी पाऊस आवश्‍यक आहे; मात्र राज्‍यात काही दिवस पाऊस पडलेलाच नाही. त्‍यामुळे शेतकरी पावसाच्‍या प्रतीक्षेत आहेत. पावसाच्‍या अभावापुढे राज्‍यात पाणीटंचाईचे संकटही ओढवले आहे.