उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपवण्याचे विधान केल्याचे प्रकरण

मुंबई – सनातन धर्माविषयी बेताल वक्तव्य करून लाखो लोकांच्या भावना दुखावण्याचा उदयनिधी स्टॅलिन यांना काय अधिकार ? त्यांच्या द्वेष पसरवणार्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही. उदयनिधी स्टॅलिन यांना महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी, अशी मागणी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अजित पवार यांच्याकडे ट्वीट करून केली आहे.
“उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी”, लोढांची राज्य सरकारकडे मागणी#MyMahanagar #MaharashtraNews #MangalPrabhatLodha #UdayanidhiStalin @MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks https://t.co/i390HpJG8g
— My Mahanagar (@mymahanagar) September 4, 2023
मंत्री लोढा पुढे म्हणाले, ‘‘स्टॅलिन यांच्यासारख्यांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही. सनातन संस्कृती ही प्रभावी औषधासारखी आहे, जी राष्ट्रविरोधी विचारधारेला भारतात वाढू देत नाही. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपवण्याचे विधान करून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे.’’
‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी सेवेची संतपरंपरा आणि आरोग्याचा मिलाप !
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार