बेगूसराय येथील शिवमंदिरातील शिवलिंग धर्मांध मुसलमानांनी तोडले !

  • संतप्त जमावाने आरोपीच्या दुकानाची केली तोडफोड !

  • पोलिसांकडून अद्याप आरोपींना अटक नाही !

ही छायाचित्रे देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक

बेगूसराय (बिहार) – येथील खातोपूर चौकाजवळील शिवमंदिरातील शिवलिंग तोडण्यात आले. यानंतर संतप्त जमावाने मुसलमान आरोपीच्या दुकानाची तोडफोड केली, तसेच त्याला अटक करण्याची मागणी करत येथील राष्ट्रीय महामार्ग रोखून ठरला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
खातोपूर चौकाजवळ वर्ष १९४४ पासून शिवमंदिर आहे. मंदिराच्या शेजारी मुसलमानांची वस्ती आहे. स्थानिकांचा आरोप आहे की, मुसलमान मंदिराजवळ मद्यप्राशन करतात, तसेच येथे मांसाचे तुकडे फेकतात. यास अनेकदा विरोध करण्यात आला आहे; मात्र कुणीही नोंद घेत नाही. (यातून बिहार भारतात नसून पाकिस्तानात आहे, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये ! या ठिकाणी एखाद्या मशिदीविषयी असे कुणी केले असते, तर पहिल्याच घटनेत हिंसाचार झाला असता आणि सरकारने तातडीने संबंधितांवर कारवाई केली असती ! – संपादक) २२ सप्टेंबरच्या रात्री मुसलमानांनी मंदिरात बसून मद्यप्राशन केले आणि नंतर शिवलिंग तोडले. त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी शिवीगाळ केली.

पोलिसांकडून आरोपींवर कारवाई नाही !

शिवलिंगाची तोडफोड करणारे आरोपी कोण आहेत ?, हे ठाऊक असूनही पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. (हे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ? अशा पोलिसांना हिंदूंनी कर भरून कशाला पोसायचे ?- संपादक)

संपादकीय भूमिका 

बिहारमध्ये जंगलराज चालू झाल्यामुळे कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने अशा घटना घडत आहेत !