खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची चंडीगड येथील संपत्ती जप्त

चंडीगड – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने बंदी असलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा नेता गुरपतवंत सिंह पन्नू याचे येथील घर आणि अन्य संपत्ती जप्त केली आहे. याखरीज अमृतसरमधील खानकोट गावातील पन्नू याची शेतभूमीही जप्त करण्यात आली आहे.

कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणात पन्नू याने कॅनडामध्ये रहाणार्‍या हिंदूंना कॅनडा सोडून जाण्याची धमकी दिली आहे. पन्नू सध्या अमेरिकेत रहात आहे. (भारताने अमेरिकेकडे पन्नू याला भारताकडे सोपवण्याची मागणी केली पाहिजे ! – संपादक)