संभाव्‍य आतंकवादी आक्रमण, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून कडक बंदोबस्‍त !

हिंदूंच्‍या सण-उत्‍सवांवर अद्यापही आतंकवादी आक्रमणाचे सावट असणे, हे पोलिसांना लज्‍जास्‍पद !

मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍यासाठी सांगलीत भव्‍य मोर्चा !

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या तसेच अन्‍य मागण्‍यांसाठी मराठा समाजाच्‍या वतीने भव्‍य मोर्चा काढण्‍यात आला. यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्‍या पुतळ्‍याला पुष्‍पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ झाला.

आगामी काळातील सार्वजनिक सण, उत्‍सव मंगलमय वातावरणात, शांततेत साजरे करा ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

सार्वजनिक गणेशोत्‍सव हा राज्‍यातील मोठा उत्‍सव आहे. आगामी काळातील येणारे सर्व सण आणि उत्‍सव जल्लोषात, गुण्‍यागोविंदाने, भक्‍तीभावाने आणि मंगलमय वातावरणात कोणतेही गालबोट न लागता साजरे करावेत, असे आवाहन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

खासगी इस्‍लामी संस्‍थांना ‘हलाल प्रमाणपत्रा’ची अनुमती देऊ नये ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

या वेळी श्री. सुनील घनवट पुढे म्‍हणाले की, सध्‍या चातुर्मास चालू आहे आणि गणेशचतुर्थीही येत आहे. अशा वेळी आपल्‍या घरात हलाल प्रमाणित उत्‍पादने येणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

अभिनेत्री झरीन खान यांच्‍या विरोधात अटक वॉरंट !

वर्ष २०१८ मध्‍ये त्‍यांनी पूजा कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी १२.५ लाख रुपये घेतले होते; मात्र नंतर फसवणूक केल्‍याने ही तक्रार करण्‍यात आली. न्‍यायालयात सतत अनुपस्‍थित राहिल्‍याने हे वॉरंट काढण्‍यात आल्‍याचे समजते.

खातेधारकांनी बॅरिकेट्‍स तोडल्‍याने पोलिसांचा लाठीमार !

घोटाळ्‍याच्‍या प्रकरणी जनतेला आंदोलन का करावे लागते ?

नगरसेवक किरण अहिरराव यांचा मृत्‍यू

धुळे येथील ४ प्रवासी कारमधून नाशिकहून धुळ्‍याकडे चालले होते. अपघात घडल्‍यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलीस अपघातस्‍थळी आले. अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्‍प झाला होता. अन्‍य मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.

सोलापूरचे जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. धनंजय पाटील यांच्‍यावर गुन्‍हा नोंद !

जी गोष्‍ट सर्व यंत्रणा हाताशी असलेल्‍या प्रशासकीय यंत्रणेच्‍या लक्षात येणे अपेक्षित आहे, ती गोष्‍ट माहिती अधिकार कार्यकर्त्‍यांना तक्रार करून लक्षात आणून का द्यावी लागते ?

छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनखे सातारा येथे आणणार ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

वाघनखे वर्ष १८२४ मध्‍ये इंग्रजांनी लंडनला नेली. १९९ वर्षानंतर आता ही वाघनखे पुन्‍हा भारतात येणार आहेत. पुढील केवळ ३ वर्षे हा अनमोल ठेवा भारतात रहाणार आहे.

भाषेचा सन्‍मान केला, तर ती तुम्‍हाला प्रतिष्‍ठा देईल ! – आशुतोष राणा, चित्रपट अभिनेते आणि लेखक

तिसर्‍या अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्‍या दुसर्‍या दिवसाच्‍या तिसर्‍या सत्रात प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी त्‍यांचे मनोगत व्‍यक्‍त केले