अभिनेत्री झरीन खान यांच्‍या विरोधात अटक वॉरंट !

कालीमाता पूजेच्‍या कार्यक्रमात उपस्‍थिन न राहिल्‍याचे कारण !

अभिनेत्री झरीन खान

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्‍टीतील अभिनेत्री झरीन खान यांनी कालीमाता पूजेच्‍या ६ कार्यक्रमांना येण्‍याचे मान्‍य करूनही त्‍या न गेल्‍याने त्‍यांच्‍या विरोधात ‘इव्‍हेंट मॅनेजमेंट’ आस्‍थापनाने तक्रार नोंद केली आहे. त्‍यामुळे कोलकाता पोलिसांनी त्‍यांच्‍या विरोधात अटक वॉरंट काढले आहे.

वर्ष २०१८ मध्‍ये त्‍यांनी पूजा कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी १२.५ लाख रुपये घेतले होते; मात्र नंतर फसवणूक केल्‍याने ही तक्रार करण्‍यात आली. न्‍यायालयात सतत अनुपस्‍थित राहिल्‍याने हे वॉरंट काढण्‍यात आल्‍याचे समजते.

या संदर्भात खान यांच्‍याशी प्रसिद्धी माध्‍यमांनी संपर्क साधण्‍याचा प्रयत्न केला असता, त्‍या वकिलांकडून माहिती घेत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. कार्यक्रमाच्‍या आयोजकांनी यात मुख्‍यमंत्री सहभागी होणार असल्‍याचे सांगितले होते; मात्र नंतर हा कार्यक्रम छोटा असल्‍याचे समजल्‍याने आयोजक खोटे बोलल्‍याचा दावा त्‍यांनी केला आहे.