नगरसेवक किरण अहिरराव यांचा मृत्‍यू

चांदवड (नाशिक) येथे भीषण अपघात

प्रतिकात्मक चित्र

नाशिक – चांदवडजवळ कार आणि कंटेनर यांचा भीषण अपघात होऊन ४ जणांचा जागीच मृत्‍यू झाला. त्‍यात धुळ्‍याचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा मृत्‍यू झाला आहे. येथील नमोकार तीर्थक्षेत्रासमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भयंकर आहे की, पूर्ण कार गोळा झाल्‍याप्रमाणे एका कडेला जाऊन पडली आहे.

धुळे येथील ४ प्रवासी कारमधून नाशिकहून धुळ्‍याकडे चालले होते. अपघात घडल्‍यानंतर सोमा टोल वेज कंपनीचे पथक आणि पोलीस अपघातस्‍थळी आले. अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्‍प झाला होता. अन्‍य मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.