खासगी इस्‍लामी संस्‍थांना ‘हलाल प्रमाणपत्रा’ची अनुमती देऊ नये ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

यंदाचा गणेशोत्‍सव ‘हलालमुक्‍त गणेशोत्‍सव’ साजरा करण्‍याचे पत्रकार परिषदेत आवाहन !

डावीकडून श्री. विठ्ठलप्रसाद पांढरे , श्री. निरंजन कुडक्‍याल, श्री. संजय साळुंखे, श्री. सुनील घनवट, श्री. राजन बुणगे व श्री. संजय हंचाटे

सोलापूर, १८ सप्‍टेंबर (वार्ता.) – भारतात सरकारच्‍या ‘एफ्.एस्.एस्.आय.’ आणि ‘एफ्.डी.ए.’ यांसारख्‍या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्‍या शासकीय संस्‍था असतांनाही हलालच्‍या नावे समांतर इस्‍लामी अर्थव्‍यवस्‍था निर्माण केली जात आहे. या अर्थव्‍यवस्‍थेतून मिळालेल्‍या धनाचा वापर जिहादी आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्‍य उपलब्‍ध करून देण्‍यासाठी केला जात आहे. भारताची सुरक्षा आणि अखंडता यांच्‍या दृष्‍टीने केंद्र सरकारने खासगी इस्‍लामी संस्‍थांना अनुमती  देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली. ते १८ सप्‍टेंबर या दिवशी सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्‍या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी समितीचे श्री. राजन बुणगे, पंतुलू (पुरोहित पद) श्री. निरंजन कुडक्‍याल, श्री हिंगुलांबिका देवी मंदिराचे पुजारी श्री. संजय हंचाटे, पूर्वभाग सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाचे अध्‍यक्ष श्री. संजय साळुंखे आदी उपस्‍थित होते.

या वेळी श्री. सुनील घनवट पुढे म्‍हणाले की, सध्‍या चातुर्मास चालू आहे आणि गणेशचतुर्थीही येत आहे. अशा वेळी आपल्‍या घरात हलाल प्रमाणित उत्‍पादने येणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. त्‍यामुळे यंदाचा गणेशोत्‍सव हा ‘हलालमुक्‍त गणेशोत्‍सव’ साजरा करावा.

या वेळी पंतुलु श्री. निरंजन कुडक्‍याल म्‍हणाले, ‘‘आम्‍हाला हलालचा धोका समजला आहे. त्‍यासाठी आम्‍ही सर्व ठिकाणी ‘हलालमुक्‍त गणेशोत्‍सव साजरा करा’, असा प्रसार करणार आहोत.’’

श्री. संजय साळुंखे म्‍हणाले, ‘‘आम्‍ही सर्व गणेश मंडळांना ‘हलाल जिहाद’च्‍या माध्‍यमातून समांतर अर्थव्‍यवस्‍था देशाला कशी धोकादायक आहे ?’, याविषयी प्रबोधन करणार आहोत. प्रत्‍येक गणेश मंडळाने ‘हलालमुक्‍त गणेशोत्‍सव’ साजरा करावा.’’