(म्हणे) ‘युद्ध हा पर्याय नसून भारताशी चर्चा करण्यासाठी सिद्ध !’ – शाहबाझ शरीफ, पाकचे पंतप्रधान

पाकने भारतामध्ये जिहादी आतंकवाद्यांना पाठवणे बंद केले पाहिजे. कुख्यात आतंकवादी हाफिज सईद, दाऊद इब्राहिम यांना भारताच्या स्वाधीन केले पाहिजे.

गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई झाल्याचे स्पष्ट ! – सर्वोच्च न्यायालय

भारताचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली मणीपूर येथील प्रकरणावर १ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या वेळी म्हटले की, ४ मे या दिवशी मणीपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या घटनेनंतर २ मासांनी गुन्हा नोंदवण्यात आला, हे स्पष्ट होते.

गुरुग्राम (हरियाणा) येथे जमावाने केली मशिदीची तोडफोड !

नूंह येथील हिंसाचाराची प्रतिक्रिया !
एकाचा मृत्यू, तर अन्य एक घायाळ

 ख्रिस्ती कुकी आतंकवादी प्रतिदिन हिंदु मैतेई समुदायावर करत आहेत गोळीबार !

मणीपूर येथील हिंसाचारामागे कुकी आतंकवादी, अमली पदार्थांची तस्करी करणारे आतंकवादी आणि म्यानमारमधून फूस लावणार्‍या शक्ती आहेत. हे लक्षात घेऊन आता भारताने अशांवर कठोर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे !

लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील समर्पण हे देशवासियांना नेहेमीच प्रेरणा देत राहील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन १ ऑगस्ट या दिवशी सन्मानित करण्यात आले. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

आंध्रप्रदेशातील एका नगरसेवकाने पालिका बैठकीत स्वतःलाच चपलेने मारले !

मतदारांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करता न आल्याची खंत !

नूंह (हरियाणा) येथील धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणात ४ हिंदू ठार !

मृतांमध्ये गृहरक्षक दलाच्या २ सैनिकांचा समावेश
धर्मांध मुसलमानांकडून एके ४७ रायफलचा वापर

सिंधुदुर्ग : ‘ऑनलाईन’ अर्जातील चुकांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित ! 

शासकीय यंत्रणेच्या चुकांमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची ‘ऑनलाईन पोर्टल’वरील माहिती वेळीच अद्ययावत करावी, अन्यथा ते लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरले जाऊ शकतात.

लोकांनी घरी बसवले तरी चालेल; परंतु मांद्रे (गोवा) गावातील जुगार बंद करणारच ! – सरपंच अमित सावंत

मांद्रे गावातील जुगार बंद करण्याची मागणी मांद्रे गावातील महिलांनी माझ्याकडे केली आहे. जुगारामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मी जुगाराचे समर्थन करणार नाही – श्री. अमित सावंत, सरपंच, मांद्रे (गोवा)

गोव्यात बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध ! – पारंपरिक मूर्तीकाराचा आरोप

बंदी आदेश केवळ कागदोपत्री काढून काय उपयोग ? प्रशासन कार्यवाही का करत नाही ?