गोव्यात बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध ! – पारंपरिक मूर्तीकाराचा आरोप

बंदी असूनही अशा मूर्ती का विकल्या जातात ?

फोंडा, ३१ जुलै (वार्ता.) – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीस गोव्यात बंदी आहे, तरीही अशा मूर्ती बाजारात कोणत्याही अडथळ्याविना विकल्या जात आहेत, असा दावा मूर्डी, खांडेपार येथील चिकण मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणारे मूर्तीकार प्रकाश च्यारी यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतांना केला आहे.

मूर्तीकार श्री. प्रकाश च्यारी

ते पुढे म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध झाल्याने श्री गणेशमूर्ती बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय करणार्‍यांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे. सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तीच्या विक्रीवरील बंदीचे कठोरतेने पालन करणे आवश्यक आहे. गोवा हस्तकला मंडळाने प्रत्येक गणेशमूर्तीवर देण्यात येत असलेले अनुदान १०० रुपयांवरून २०० रुपये केले पाहिजे. चिकण माती कालवण्यासाठी शासनाच्या वतीने यंत्र उपलब्ध करून देण्यात आल्याने त्याचा मूर्तीकारांना पुष्कळ लाभ झालेला आहे.’’

संपादकीय भूमिका

बंदी आदेश केवळ कागदोपत्री काढून काय उपयोग ? प्रशासन कार्यवाही का करत नाही ?

हे ही वाचा –

गोव्यातील पारंपरिक गणेशमूर्तीकारांमध्ये व्यवसाय बंद पडण्याची भीती !
https://sanatanprabhat.org/marathi/706629.html