जुगार बंद होण्यासाठी ठाम निर्धार करणारे मांद्रेचे सरपंच अमित सावंत यांचे अभिनंदन !
पेडणे, ३१ जुलै (वार्ता.) – गावात जुगारबंदी केली म्हणून मला पुढच्या वेळी लोकांनी घरी बसवले तरी चालेल; मात्र मी मांद्रे गावातील जुगार बंद करणारच, अशी ग्वाही मांद्रे पंचायतीचे सरपंच अमित सावंत यांनी दिली. मांद्रे गावातील जुगार बंद करण्याचे निवेदन सरपंच अमित सावंत यांनी पेडणे पोलिसांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच सावंत बोलत होते.
Mandrem Gambling News: लोकांनी निवडणूकीत घरी बसवले तरी चालेल, पण जुगार बंद करणारच; मांद्रे सरपंचांचा निर्णय#Mandrem #Gambling #GoaNews #marathinews #Pernem #Police #Cmpramodsawant #Dainikgomantakhttps://t.co/REJ9xaMqEv
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) July 31, 2023
ते पुढे म्हणाले,
‘‘मांद्रे गावातील जुगार बंद करण्याची मागणी मांद्रे गावातील महिलांनी माझ्याकडे केली आहे. जुगारामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मी जुगाराचे समर्थन करणार नाही.
(सौजन्य : In Goa 24×7)
यापूर्वी पेडणे मतदारसंघाचे माजी आमदार तथा बिहार राज्याचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात जुगारबंदीचा निर्णय घेतला होता आणि यामुळे त्यांना पुढच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.