|
नूंह (हरियाणा) – येथे ३१ जुलैला विश्व हिंदु परिषदेकडून काढण्यात आलेल्या ब्रज मंडल यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात ४ हिंदू ठार झाले. यात गृहरक्षक दलाचे सैनिक नीरज आणि अन्य एक सैनिक यांचा समावेश आहे. त्यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दंगलीत ५० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर जण घायाळ झाले आहेत.
हरियाणा में विश्व हिंदू परिषद की ब्रजमंडल यात्रा पर पथराव: 40 गाड़ियां फूंकी; नूंह जिले की सीमाएं सील, इंटरनेट बंद, धारा 144 लागूhttps://t.co/FwmG37HLyS#Haryana #MonuManesar #BrajMandalYatra pic.twitter.com/WH4aiIGffd
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 31, 2023
१. धर्मांधांनी येथे मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी झालेल्या हिंदूंच्या वाहनांची जाळपोळ केली, तसेच येथील हिंदूंची दुकानेही जाळली, तर गोरखनाथ मंदिरावर दगडफेक करून दार तोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी मंदिराच्या पुजार्याला मारहाण करण्यात आली.
२. धर्मांधांकडून एके ४७ रायफलमधून गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हे आक्रमण नियोजनबद्धरित्या करण्यात आल्याचे प्राथामिक स्तरावर लक्षात येत आहे.
३. धर्मांधांनी येथील अनाज मंडी येथे असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड केली. बसद्वारे पोलीस ठाण्याची भिंत पाडण्यात आली. पोलिसांचे वाहन जाळण्यात आले. पोलीस ठाण्यातील कागदपत्रे जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
४. ‘हिरो’ आस्थापनाच्या दुचाकींच्या दुकानावर आक्रमण करून तेथील २०० दुचाकी चोरण्यात आल्या. तसेच दुकानाला आग लावण्याचा प्रयत्न केला.
५. धर्मांध मुसलमानांनी ३ किलोमीटर मार्गावरील सर्व वाहने जाळली.
६. सध्या येथे अर्धसैनिकदलाच्या २० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नूंह जिल्ह्यात २ दिवसांसाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. इंटरनेट बंद करण्यात आले आहे. नूंहच्या शेजारील रेवाडी, गुरुग्राम, पलवल आणि फरीदाबाद या जिल्ह्यांमध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे. या भागातील शिक्षण संस्थांना १ ऑगस्ट या दिवशी सुटी देण्यात आली होती.
७. नूंहमधील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा रहित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा १ आणि २ ऑगस्ट या दिवशी होणार होत्या. शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्याधिकारी प्रशांत पनवार यांनी सर्व समाजाची बैठक बोलावली होती.
संपादकीय भूमिका
|
दोषींना सोडले जाणार नाही ! – मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर
हरियाणाचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले की, ही घटना दुर्दैवी आहे. मी सर्व जनतेला राज्यात शांतता राखण्याचे आवाहन करतो. दोषींना कोणत्याही किमतीत सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
सौजन्य: News18 Debate & Interview
दंगलीमागे षड्यंत्र ! – हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज
हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज म्हणाले की, हिंसाचार करणार्यांना सोडण्यात येणार नाही. सध्या चौकशी चालू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. सध्या आमचा उद्देश शांतता स्थापित करणे, हा आहे. नूंह येथे जाणीवपूर्वक हिंसाचार करण्यात आला आहे आणि यामागे षड्यंत्र आहे.
संपादकीय भूमिकानूंह येथे दंगलीचे षड्यंत्र रचण्यात आले आहे, हे पोलिसांच्या गुप्तचर विभागाला आधीच का लक्षात आले नाही, याचीही चौकशी करण्याची आवश्यकता आहे ! |