मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करता न आल्याची खंत !
अनकापल्ले (आंध्रप्रदेश) – नरसिपट्टणम् नगरपालिकेच्या प्रभाग २०चे नगरसेवक मुलापार्थी रामराजू यांनी परिषदेच्या बैठकीत ‘मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करता येत नाही’ असे सांगत स्वतःला चपलेने मारले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
తెలుగుదేశం పార్టీ తరపున గెలిచిన లింగాపురం గ్రామ గిరిజన ప్రజాప్రతినిధి ఆయన. పదవిలో ఉండి కూడా 30 నెలలుగా గ్రామంలో ఒక్క కుళాయి కూడా వేయించలేకపోయానని… దీనికంటే చచ్చిపోవడం నయమని కౌన్సిలర్ల సమావేశంలో కన్నీరు పెట్టుకుని, చెప్పుతో కొట్టుకున్నారాయన.#AndhraPradesh #NalugellaNarakam… pic.twitter.com/u6k4E5KXZy
— Telugu Desam Party (@JaiTDP) July 31, 2023
रामराजू यांनी पत्रकारांना सांगितले की, मला नगरसेवकपदी निवडून ३१ मास झाले, पण मला माझ्या प्रभागातील नाले, वीज, स्वच्छता, रस्ते आणि इतर समस्या सोडवता येत नाहीत. मी सर्व पर्याय वापरून पाहिले; पण मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत. स्थानिक पालिका अधिकार्यांकडून माझ्या प्रभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. माझ्या एकाही मतदाराला पिण्याच्या पाण्याच्या नळाची जोडणी देता आली नाही. अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मागणी मतदार करत असल्याने आश्वासनांची पूर्तता करता न आल्याने परिषदेच्या बैठकीतच मरणे चांगले.
संपादकीय भूमिकामतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करता न येणे आणि पूर्ण न करता येणारी आश्वासने देऊन लोकांना मूर्ख बनवणे या दोन्ही कारणांसाठी जर लोकप्रतिनिधींनी स्वतःला चपलेने मारायचे ठरवले, तर कुणीही यापासून वाचणार नाही, असेच जनतेला वाटेल ! |