गुरुग्राम (हरियाणा) येथे जमावाने केली मशिदीची तोडफोड !

  • नूंह येथील हिंसाचाराची प्रतिक्रिया !

  • एकाचा मृत्यू, तर अन्य एक घायाळ

गुरुग्राम (हरियाणा) – नूंह येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर आक्रमण केल्यानंतर शेजारील गुरुग्राम जिल्ह्यात त्याची प्रतिक्रिया उमटल्या. येथील सेक्टर ५६ आणि ५७ येथे बांधकाम चालू असलेल्या मशिदीची १०० ते २०० जणांच्या जमावाने तोडफोड करून तेथे जाळपोळ केली. यात महंमद साद या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर खुर्शीद आलम हा घायाळ झाला. जमावाने प्रथम घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस दलावर दगडफेक केली. यानंतर मशिदीवर आक्रमण केले. मशिदीमध्ये गोळीबार करण्यात आल्याने महंमद सादर याचा मृत्यू झाल्याचे, तर खुर्शीद आलम हा घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरातील धार्मिक स्थळांभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हरियाणा अंजुमन ट्रस्टचे अध्यक्ष महंमद अस्लम खान यांनी सांगितले की, नूंह येथील हिंसाचारानंतर पोलिसांचे एक पथक संध्याकाळी येथे पोचले होते. त्यांनी सुरक्षेची हमी दिली होती; मात्र पोलीस संरक्षण असतांनाही हे आक्रमण झाले. (पोलीस संरक्षण असतांनाही हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर नूंह येथे आक्रमण करण्यात आले होते. यावरून पोलीस संरक्षण म्हणजे बुजगावणे आहे का ?, असा प्रश्‍न पडतो ! – संपादक) 

पलवल (हरियाणा) येथे भंगारवाल्या मुसलमानांच्या झोपड्या जाळल्या !

पलवल येथील परशुराम कॉलनीजवळील २५ ते ३० झोपड्या अज्ञातांकडून जाळण्यात आल्या. या झोपड्या भंगाराचे काम करणार्‍या मुसलमानांच्या असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेपूर्वी एका मशिदीजवळ दुचाकी जाळण्यात आली, तर एका ठिकाणी शिलाईयंत्राचे दुकान जाळण्यात आले.

संपादकीय भूमिका

या घटनेनंतर आता सर्व निधर्मीवादी राजकीय पक्ष, नेते, संघटना निषेध करण्यासाठी पुढे येतील !