सिंधुदुर्ग : ‘ऑनलाईन’ अर्जातील चुकांमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित ! 

शासकीय यंत्रणेच्या चुकांमुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित रहाणार आहेत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची ‘ऑनलाईन पोर्टल’वरील माहिती वेळीच अद्ययावत करावी, अन्यथा ते लाभार्थी कायमस्वरूपी अपात्र ठरले जाऊ शकतात.

लोकांनी घरी बसवले तरी चालेल; परंतु मांद्रे (गोवा) गावातील जुगार बंद करणारच ! – सरपंच अमित सावंत

मांद्रे गावातील जुगार बंद करण्याची मागणी मांद्रे गावातील महिलांनी माझ्याकडे केली आहे. जुगारामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मी जुगाराचे समर्थन करणार नाही – श्री. अमित सावंत, सरपंच, मांद्रे (गोवा)

गोव्यात बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध ! – पारंपरिक मूर्तीकाराचा आरोप

बंदी आदेश केवळ कागदोपत्री काढून काय उपयोग ? प्रशासन कार्यवाही का करत नाही ?

‘आय.आय.टी.’साठी लवकरच कायमस्वरूपी भूमी उपलब्ध करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सरकारला ‘आय.आय.टी.’साठी भूमी उपलब्ध करण्यास अपयश आल्याचे सांगितले. त्यावर असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत शिक्षणासंबंधी अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना दिले.

विरोधी गटातील ७ आमदारांचे गोवा विधानसभेत असभ्य वर्तन !

विरोधी गटातील सदस्यांनी ३१ जुलै या दिवशी केलेले असभ्य वर्तन अशोभनीय आहे आणि असे वर्तन यापुढे कदापि सहन करणार नाही. विरोधी आणि सत्ताधारी गटांतील सदस्य यांच्या विनंतीवरून आमदारांच्या निलंबनामध्ये शिथिलता आणण्यात आली आहे.

फळाची अपेक्षा न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करा !

‘क्रियमाणकर्माचा पूर्ण वापर करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा; पण फलनिष्पत्ती प्रारब्धावर किंवा देवावर सोडा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हानीकारक अहंकार !

इंग्रजांनी जगातील ज्‍या देशांवर राज्‍य केले, तेथे त्‍यांनी त्‍यांची संस्‍कृती, परंपरा, खेळ आदी नेले; मात्र मोजक्‍याच देशांनी इंग्रजांचे राज्‍य गेल्‍यावर त्‍यातील काही गोष्‍टी स्‍वीकारल्‍या, तर अनेकांनी अस्‍मिता म्‍हणून नाकारल्‍या.

पावसाळा आणि दूध

सतत पाऊस पडत असल्‍यास शरिरातील अग्‍नी मंद होतो. अशा वेळी विशेषतः शाळकरी मुलांना सकाळी भूक नसल्‍यास दूध घेण्‍याचा आग्रह करणे टाळावे. पावसाळा संपल्‍यावर पचनशक्‍तीचा अंदाज घेऊन (भूक किती लागते, हे पाहून) मग दूध चालू करायचे का, ते पहावे.’

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असलेल्‍या हिंदु राष्‍ट्राच्‍या निर्मितीसाठी घडणारे कालपरिवर्तन !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेही पूर्वीपासून ‘भारत हे हिंदु राष्‍ट्र होईल’, असे सांगत आहेत. त्‍याचाच हा प्रारंभ आहे ! पंडित धीरेंद्र शास्‍त्री यांच्‍याप्रमाणे अन्‍य संतही अशाच प्रकारे मोठ्या प्रेरणेने कार्यान्‍वित होत आहेत.

फसव्‍या चीनच्‍या तकलादू छत्र्या !

काही दिवसांपूर्वी चर्चगेट रेल्‍वेस्‍थानकाजवळ गेल्‍यावर नवीन प्रकारच्‍या आणि पुष्‍कळ मोठा घेर असलेल्‍या छत्र्यांची विक्री चालू होती.