निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २१९
दूध पौष्टिक असले, तरी ते पचले, तरच उपचारक ठरते. शरिरातील अग्नी (पचनशक्ती) मंद असतांना दूध प्यायल्यास सर्दी, खोकला, दमा, ताप, अपचन, बद्धकोष्ठता, थकवा येणे, कृशता (हडकुळेपणा), लठ्ठपणा, त्वचा विकार असे त्रास होऊ शकतात. सतत पाऊस पडत असल्यास शरिरातील अग्नी मंद होतो. अशा वेळी विशेषतः शाळकरी मुलांना सकाळी भूक नसल्यास दूध घेण्याचा आग्रह करणे टाळावे. पावसाळा संपल्यावर पचनशक्तीचा अंदाज घेऊन (भूक किती लागते, हे पाहून) मग दूध चालू करायचे का, ते पहावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.७.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan |