‘द केरल स्टोरी’विषयीची शबाना आझमी यांची ‘चलाखी’ सामाजिक माध्यमांतून उघड !

त्यांनी ट्वीट करून म्हटले होते की, ‘लाल सिंह चड्डा’ या चित्रपटावर बंदी घालण्याची यापूर्वी करण्यात आलेली मागणी ज्याप्रमाणे चुकीची आहे, त्याचप्रमाणे ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणेही चुकीचे आहे.

पाकिस्तानातील हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू !

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेचे प्रकरण
देशभरात हिंसाचार चालूच !
देशभरातील खासगी शाळा बंद !

असे नेते देशाचे भले करू शकतील का ?

‘बहुतेक राजकीय पक्षांचे काही कार्यकर्तेच नाही, तर काही नेतेही पगारी नोकराप्रमाणे असतात. दुसर्‍या पक्षाने अधिक पैसे दिल्यास ते त्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते होतात ! असे कार्यकर्ते आणि नेते देशाचे भले करू शकतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने रक्तदात्यांना शिवचरित्राचे वाटप !

आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४६० जणांनी रक्तदान केले.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचा कळस आणि पालखी प्रदक्षिणा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासाठी भाविकांनी ३७ किलो चांदीची पालखी दिली आहे. याच समवेत मंदिराला नवीन कळस बसवण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे बनावट आधुनिक वैद्य मोहसीन खान याच्‍याकडून वैद्यकीय अधिकार्‍यांना जिवे मारण्‍याची धमकी !

धर्मांधाने प्रशासकीय इमारतीत घुसून अधिकार्‍याला उघडपणे दमदाटी करणे हे कायदा-सुव्‍यस्‍थेचा धाक नसल्‍याचे लक्षण !

भूमाफियांच्‍या आर्थिक लाभासाठीच ‘गोरक्षण संस्‍थे’च्‍या भूमीवरून समितीला हटवण्‍याचे कार्य चालू ! – सुनील पावसकर, गोरक्षण बचाव समिती, अध्‍यक्ष

येथील मध्‍यवर्ती भागात असलेल्‍या ‘गोरक्षण संस्‍थे’च्‍या जागेवर विकास आराखड्याच्‍या नावाखाली आरक्षण टाकून व्‍यापारी संकुलनाचा घाट घातला जात आहे. कराड नगर परिषद तांत्रिक कारणे देऊन आरक्षणाची सद्यस्‍थितीची माहिती देण्‍यास टाळाटाळ करत आलेली आहे.

नवे पारगाव (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील ग्रामपंचायतीचा दुकानदारांनी शीतपेय विक्री न करण्‍याचा ठराव !

ग्रामसभेत चर्चा करून कोणत्‍याही दुकानदाराने गावात शीतपेयाची विक्री करू नये, तसेच त्‍याचे विज्ञापन त्‍यांच्‍या दुकानासमोर करू नये, असा ठराव केला आहे. अशी विक्री करतांना दुकानदार आढळल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍याची चेतावणीही सरपंचांनी नोटिसीद्वारे दिली आहे.

पुणे शहरातील रस्‍त्‍यांच्‍या दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष केल्‍याची याचिका मुंबई उच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट !

पुणे महानगरपालिकेच्‍या विरोधात शहरातील रस्‍त्‍यांची देखभाल, दुरुस्‍ती आणि शास्‍त्रीय पद्धतीने योग्‍य बांधकाम करण्‍यात दुर्लक्ष केल्‍याचा आरोप करत कनीज ए फातेमाह सुखरानी आणि पुष्‍कर कुलकर्णी यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयामध्‍ये जनहित याचिका प्रविष्‍ट केली आहे.