|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केल्यानंतर पाकमध्ये चालू असलेला हिंसाचार दुसर्या दिवशी अधिक मोठ्या प्रमाणात चालू होता. यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
१. इम्रान खान यांचे समर्थक आणि त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) या पक्षाचे कार्यकर्ते पेशावर, रावळपिंडी, इस्लामाबाद, लाहोर आदी शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ, तोडफोड करत आहेत. ९ मे या दिवशी त्यांनी रावळपिंडी येथील सैन्याच्या मुख्यालयामध्ये तोडफोड केली. सैन्याच्या अनेक वरिष्ठ अधिकार्यांच्या निवासस्थानात घुसून तोडफोड केली. लाहोरमधील गव्हर्नर हाऊस जाळण्यात आले. कराचीच्या कँट परिसरात तोडफोड करण्यात आली. १० मे या दिवशी पेशावर येथील रेडिओ केंद्र जाळण्यात आले. काही ठिकाणी समर्थकांकडून गोळीबारही करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे पीटीआय पक्षाकडून वैध मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. राजधानी इस्लामाबाद शहर आणि पंजाब प्रांत येथे २ दिवस कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. पेशावरमध्ये ३० दिवसांसाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. इस्लामाबाद पोलिसांनी सांगितले की, हिंसाचारामध्ये ५ अधिकारी घायाळ झाले आहेत, तर ४३ आंदोलकांना कह्यात घेण्यात आले आहे.
३. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची वृत्त पाकच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दुसरीकडे या पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले की, देशात होत असलेला हिंसाचार आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत नाही, तर सरकारच्या गुंडांकडून तो करण्यात येत आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही तोडफोड केलेली नाही.
इमरान खान की गिरफ्तारी से जल उठा पाकिस्तान, सेना-पुलिस के खिलाफ खड़ी हुई जनता, अबतक 6 की मौतhttps://t.co/Ym0Vcu6PPG
— News24 (@news24tvchannel) May 10, 2023
विदेशातही आंदोलने !
पाकिस्तानच नाही, तर जगातील काही देशांमध्येही इम्रान खान यांच्या समर्थकांकडून त्यांच्या अटकेच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. यात अमेरिकेतील शिकागो आणि न्यूयॉर्क शहर, ब्रिटनमधील लंडन अन् मँचेस्टर येथे निदर्शने केली जात आहेत. पाकच्या दूतावासाबाहेरही आंदोलने केली जात आहेत.