पुणे शहरातील रस्‍त्‍यांच्‍या दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष केल्‍याची याचिका मुंबई उच्‍च न्‍यायालयात प्रविष्‍ट !

पुणे महानगरपालिका

पुणे – पुणे महानगरपालिकेच्‍या विरोधात शहरातील रस्‍त्‍यांची देखभाल, दुरुस्‍ती आणि शास्‍त्रीय पद्धतीने योग्‍य बांधकाम करण्‍यात दुर्लक्ष केल्‍याचा आरोप करत कनीज ए फातेमाह सुखरानी आणि पुष्‍कर कुलकर्णी यांनी मुंबई उच्‍च न्‍यायालयामध्‍ये जनहित याचिका प्रविष्‍ट केली आहे.

या याचिकेमध्‍ये पुणे महानगरपालिका, महाराष्‍ट्र राज्‍य नगरविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम यांनावादी करण्‍यात आले आहे. दायित्‍वशून्‍यतेने सिद्ध केलेल्‍या रस्‍त्‍यांमुळे अपघात, वाहतूक कोंडी, इंधनाचा अपवापर आणि प्रदूषण होत आहे. याचिकाकर्त्‍यांनी मे २०२२ पासूनची रस्‍त्‍यांची छायाचित्रे काढून ती संबंधित विभागांना पाठवली आहेत.