श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचा कळस आणि पालखी प्रदक्षिणा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

श्री महालक्ष्मीदेवी

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासाठी भाविकांनी ३७ किलो चांदीची पालखी दिली आहे. याच समवेत मंदिराला नवीन कळस बसवण्यात येणार आहे. या दोन्हींचा शहर प्रदक्षिणा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला पडला. या प्रसंगी अनेक महिला कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. प्रदक्षिणेनंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. प्रारंभी नदीवेस येथे पू. शिवलिंगेश्वर महास्वामीजी, गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, पू. भगवानगिरी महाराज, डॉ. आनंद गोवासी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कळस आणि पालखी यांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी यात्रा समितीचे अध्यक्ष रमेश रिंगणे, ‘श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष राजेंद्र तारळे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पालखीला सुवर्ण मुखवटा अर्पण करणार्‍या सौ. वर्षा आजरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ११ मे या दिवशी मंदिरावर नवीन कळस बसवण्यात येणार आहे.