‘द केरल स्टोरी’विषयीची शबाना आझमी यांची ‘चलाखी’ सामाजिक माध्यमांतून उघड !

अभिनेत्री शबाना आझमी

मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाविषयी  ट्वीट करून म्हटले होते की, ‘अभिनेते आमिर खान यांच्या ‘लाल सिंह चड्डा’ या चित्रपटावर बंदी घालण्याची यापूर्वी करण्यात आलेली मागणी ज्याप्रमाणे चुकीची आहे, त्याचप्रमाणे सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणेही चुकीचे आहे. एकदा चित्रपटाला केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे (‘सेन्सॉर बोर्डा’चे) प्रमाणपत्र मिळाले की, अन्य कुठल्याही घटनात्मक संस्थांची त्यात भूमिका नसते.’

यानंतर सामाजिक माध्यमांच्या वापरकर्त्यांनी आझमी यांच्या ट्वीटमधील धूर्तपणा उघड केला. सामाजिक माध्यमांच्या वापरकर्त्यांनी ‘शबाना आझमी यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये ‘द केरल स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी प्रत्यक्ष जरी केली नसली, तरी त्या माध्यमातून त्यांनी अतिशय चतुराईने अमिर खान यांच्या ‘लाल सिंह चड्डा’ या चित्रपटावर बहिष्काराची मागणी करणार्‍यांना लक्ष्य केले’, असे म्हटले आहे. अमिर खान यांच्या ‘लाल सिंह चड्डा’ या चित्रपटावर बंदी घालण्याविषयी कुणीही बोलले नव्हते.

शबाना आझमी यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना अनेकांनी बंदी आणि बहिष्कार यांचा अर्थ स्पष्ट केला. एका वापरकर्त्याने लिहिले आहे, ‘शबानाजी तुम्ही एवढेच सांगायला हवे होते की, ‘द केरल स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी होत आहे, तर  ‘लाल सिंह चड्डा’वर बंदी घालण्याविषयी कधीही चर्चा झाली नाही.

बॉलीवूड आणि त्यांच्या हिंदुविरोधी मानसिकतेमुळे अनेकांनी ‘लाल सिंह चड्डा’ या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन यापूर्वी केले होते.