नवे पारगाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य निर्णय !

कोल्हापूर – शीतपेयांमध्ये ‘कॅफिन’ वापरलेले आढळून येते. ही पेये घेण्याचे प्रमाण १८ वर्षांखालील युवकांमध्येे अधिक आढळून आले. यामुळे युवकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. तरी नवे पारगाव येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत चर्चा करून कोणत्याही दुकानदाराने गावात शीतपेयाची विक्री करू नये, तसेच त्याचे विज्ञापन त्यांच्या दुकानासमोर करू नये, असा ठराव केला आहे. अशी विक्री करतांना दुकानदार आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणीही सरपंचांनी नोटिसीद्वारे दिली आहे.
‘अनेक चित्रपट अभिनेते, खेळाडू शीतपेयांचे विज्ञापन करतांना दिसतात; मात्र त्या पेयांतून काहीच लाभ होत नसल्याचे संशोधनांतून उघड झाले. यापेक्षा तरुणांनी ताक, उसाचा रस, लिंबू सरबत, मठ्ठा अशा स्वदेशी पेयांकडे वळावे. नवे पारगावप्रमाणे अन्य ग्रामपंचातींमध्येही असा निर्णय व्हावा’, अशी मागणी ग्रामस्थ आणि नागरिक करत आहेत.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !