भारताने पाडले पाकिस्तानी तस्करांचे २ ड्रोन

१५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

भारतीय सैन्याने पाडलेले पाकिस्तानी ड्रोन

अमृतसर (पंजाब) – येथील सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी तस्करांनी एकाच रात्री पाठवलेले २ ड्रोन पाडले. या ड्रोनच्या माध्यमातून हेरॉईन पाठवण्यात आले होते. ड्रोन पाडल्यानंतर त्या परिसरात शोधमोहीम चालू केल्यानंतर १५ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन सापडले.