अंतराळ संशोधनासाठी पैसे खर्च करण्यात भारत जगात ७ व्या क्रमांकावर !

अंतराळ संशोधनासाठी अमेरिका भारताच्या तुलनेत ३२ पटींहून अधिक पैसे खर्च करते. ही माहिती द हेग येथील ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ या खासगी आस्थापनाने दिली आहे.

सोन्याची तस्करी कपड्यांमध्ये लपवून करणार्या धर्मांधाला अटक !

सोन्याची तस्करी कपड्यांमध्ये लपवून करणारा बिहारमधील जमिउल्ला अहमद (वय ३९ वर्षे) याला सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.

समीर वानखेडे यांच्या ६ परदेशी दौर्यांसाठी पावणे नऊ लाखांचा खर्च !

मली पदार्थविरोधी पथकाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधातील दक्षता अहवाल आला आहे. आर्यन खान याला अमली पदार्थांच्या प्रकरणात न अडकवण्यासाठी शाहरूख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

श्री शनिदेवाची जयंती केक कापून साजरी करण्याची पाश्‍चात्त्य कुप्रथा बंद !

श्रीक्षेत्र शनीशिंगणापूर येथील ‘श्री शनैश्‍चर’ या जागृत देवस्थानच्या ठिकाणी मागील ३-४ वर्षांपासून काही भाविक श्री शनिदेवतेची जयंती पाश्‍चात्त्य पद्धतीने केक कापून साजरा करत होते.

एल्.ई.डी. मासेमारीविषयी अभ्यास करून अनुमती दिली जाईल ! – केंद्रीय मत्सोद्योग मंत्री रूपाला

‘‘एल्.ई.डी.च्या उजेडात मासेमारी करण्याला जी बंदी आहे ती उठवावी, अशी मागणी आहे. याविषयी इतर देशांमध्ये एल्.ई.डी.च्या उजेडात मासेमारी केली जाते का ? याचा अभ्यास केला जाईल. तसेच तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टीने त्याचा अभ्यास करून निर्णय दिला जाईल.’’

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन थांबवण्याची मनसेची मागणी

चिरे खाणीसाठी एका भूमीचा अहवाल दाखवून दुसर्‍याच भूमीत चिर्‍यांचे उत्खनन चालू आहे. या दोन्ही भूमींचा सातबारा वेगवेगळा आहे. एका व्यक्तीच्या अनुमतीवर एकाहून अधिक चिर्‍यांच्या खाणी चालू आहेत.

गोवा : १५ वर्षे जुनी असलेली १ लाख ९२ सहस्र वाहने कालबाह्य ठरणार !

गोव्यात सध्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळ जुनी असलेली जवळजवळ १ लाख ९२ सहस्र वाहने असून ती भंगारात काढण्यायोग्य आहेत. भंगारात काढल्या जाणार्‍या वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी असलेली वाहने अधिक प्रमाणात आहेत.

शेतकर्‍यांना प्रलंबित थकबाकी आणि अनुदान लवकरच संमत करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा

१९ ते २१ मे २०२३ या कालावधीत हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शासकीय कृषी योजना आणि नवीन अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान यांविषयी शेतकर्‍यांना माहिती देण्यात येत आहे.

सातारा येथे शुद्ध पाण्यासाठी ‘चक्का जाम आंदोलन’ !

दीड मासापासून शहरातील पश्चिम भागात दूषित पाण्याचा पुरवठा नगरपालिकेकडून केला जात आहे. वारंवार सांगूनही शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही. याच्या निषेधार्थ ढोणे कॉलनी, मनामती चौक, रामाचा गोट परिसरातील नागरिकांनी मोती चौक येथे ‘चक्का जाम आंदोलन’ केले.

(म्‍हणे) ‘राज्‍यात मोर्चे काढून अश्‍लाघ्‍य भाषा वापरणार्‍यांवर गृहमंत्र्यांनी कारवाई करावी !’

मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एवढेच सांगेन की, तुम्ही त्र्यंबकेश्वर धूप प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाची नियुक्ती करा; पण ज्या लोकांनी राज्यभर मोर्चे काढून अश्लाघ्य भाषा वापरली आहे, त्यांच्या विरोधातही काहीतरी करा. ‘त्या’ १०-१२ संघटना आहेत, त्यांना कुठला निधी मिळतो ? ते काय करतात ? लोकांना काय शिकवतात त्यांची चौकशी करा, अशी मुक्ताफळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी १८ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना उधळली.