(म्हणे) ‘वादग्रस्त भागात बैठक घेण्यास आमचा विरोध !’

 चीनचा श्रीनगर येथील जी २० बैठकीत येण्यास नकार !

प्रतिकात्मक चित्र

बीजिंग (चीन) – श्रीनगर येथे २२ ते २४ मे कालावधीत तिसरी ‘जी २०’च्या पर्यटन कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित रहाण्यास चीनने नकार दिला आहे. यासह तुर्कीये आणि सौदी अरेबिया या देशांनीही या बैठकीसाठी नोंदणी केलेली नाही.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटले आहे की, वादग्रस्त भागात कोणत्याही स्वरूपात जी -२० बैठक घेण्यास चीनचा ठाम विरोध आहे. अशा बैठकांना आम्ही उपस्थित रहाणार नाही. यावर भारताने ‘स्वतःच्या सीमेमध्ये बैठका घेण्यास भारत स्वतंत्र आहे’, अशा शब्दांत चीनला प्रत्युत्तर दिले.

श्रीनगरमध्ये होणार्‍या या बैठकीला जी २० देशांतील अनुमाने ६० प्रतिनिधी उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. यापूर्वी १०० हून अधिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित रहाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका :

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनने जसे तिबेटला गिळंकृत केले आहे, तसे भारताने काश्मीरचे केलेले नाही. उद्या जर ‘जी २०’ ची बैठक तिबेटमध्ये आयोजित केली, तर भारतानेही या बैठकीला उपस्थित न रहाता चीनला जशास तसे उत्तर दिले पाहिजे !