सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेल्या उत्सवचिन्हाच्या (बिल्ल्याच्या) संदर्भातील अनुभूती
‘संत म्हणजे चैतन्याचे स्रोत ! संतांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे कपडे, त्यांचे लिखाण आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य सामावलेले असते अन् प्रत्येक वस्तूमधून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते. त्यामुळे अशा वस्तू जपून ठेवण्याची पद्धत रूढ आहे.