तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे निझामाचे ८वे वंशज, तर हैद्राबाद पोलीस रझाकारांचे सैन्य ! – आमदार टी. राजासिंह

श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या वेळी टी. राजासिंह यांनी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याविषयी ते बोलत होते.

मध्यप्रदेश सरकारने नसरुल्लागंजचे नाव पालटून केले भैरूंदा !

मध्यप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील नसरुल्लागंज शहराचे नाव पालटून भैरूंदा केले आहे. याविषयीची सूचना सरकारकडून प्रसारित करण्यात आली आहे.

इटलीमध्ये संभाषणासाठी इंग्रजी आणि अन्य विदेशी भाषांवर बंदी घालण्यात येणार !

इटली सरकार लवकरच देशात इंग्रजी भाषेच्या वापरावर बंदी घालणार आहे.जर कुणी विदेश भाषांमध्ये संभाषण केले किंवा त्याचा वापर केला, तर त्याला दंड भरावा लागणार आहे.

अमेरिकेतील चक्रीवादळात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू

३१ मार्च आणि १ एप्रिल या दिवशी हे चक्रीवादळ आले होते. या चक्रीवादळामुळे असंख्य लोकांची घरे उद्ध्वस्त झाली.

मॅक्सिकोत हवेत उडणार्‍या गरम हवेच्या फुग्याला आग : पर्यटकांनी खाली उड्या मारल्या !

यात २ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३९ वर्षीय महिला आणि एक ५० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

बालिकेवर बलात्काराच्या प्रकरणी दोघा शिक्षकांना आजन्म कारावासाची शिक्षा

वरील दोघा नराधम शिक्षकांनी बालिकेला शाळेतील स्वच्छतागृहात नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला होता. हा खटला लढत असतांना पीडितेच्या वडिलांची नोकरीही गेली होती. तथापि त्यांनी हार न मानता चिकाटीने लढा दिला.

अज्ञातांच्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार !

हे आक्रमण कुणी केले ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सासाराम (बिहार) येथे धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीनंतर हिंदूंचे पलायन !

भारतात मुसलमान नाही, तर हिंदुच असुरक्षित आहेत, हेच अशा घटनांतून परत परत सिद्ध होतो ! आधी तुम्ही तुमचे प्राण वाचवा, जीव राहिला, तर अनेक घरे मिळतील ! – साहाय्य मागणार्‍या हिंदूंना पोलिसांचे उत्तर

मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात ६ धर्मांध मुसलमान घायाळ

रमझानच्या काळात बाँब बनवणे आणि त्याचा वापर हिंदूंना ठार मारण्यासाठी करणे, यांविषयी मुसलमानांचे धर्मगुरु, नेते, अभिनेते नसरुद्दीन शाह, पत्रकार राणा अयुब यांच्यासारखे लोक तोंड का उघडत नाहीत ?

केरळमधील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद भरतन् यांचे निधन

गोविंद भरतन् हे ‘भारतीय वाक्य परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष होते. मंदिरांशी संबंधित अनेक खटले त्यांनी लढवले आहेत. हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित करण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते नेहमी सहभागी होत असत.