गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी ३२ जणांवर गुन्हा नोंद !

अंबड तालुक्यातील आपेगाव, साष्टपिंपळगाव, गोंदी सिद्धेश्वर पॉईंट या ठिकाणच्या गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर केणीद्वारे अवैध वाळू उपसा आणि साठा करणार्‍या ३२ जणांवर गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ८१० कोटी रुपयांची विक्रमी मिळकतकर वसुली !

महापालिकेला २०२२-२३ या आर्थिक वर्षातील मिळकतकरापोटी ८१० कोटी रुपये ३१ मार्च २०२३ पर्यंत जमा झाले. ही रक्कम गेल्या ४० वर्षांतील विक्रमी मिळकतकर आहे. गेल्या वर्षी ही रक्कम ६२८ कोटी रुपये होती.

चैत्र एकादशीनिमित्त पंढरपूर येथे ५ लाख भाविकांची मांदियाळी !

एकादशीच्या पहाटे श्री विठ्ठलाची नित्यपूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांनी, तर श्री रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे यांनी केली.

परमोच्च त्याग आणि समर्पण भावना म्हणजे भगवा रंग ! – शरद पोंक्षे, अभिनेते

आदर्श कसा असावा ? ते सांगणारे उदाहरण म्हणजे प्रभु श्रीराम आहेत. राजकारण धुरंधर कृती म्हणजे श्रीकृष्ण आहेत. अवतारी पुरुषांनी हातात भगवा घेतला होता. सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या वेळी अवकाश भगवेमय होते.

क्रिकेटपटू सुरेश रैना यांच्या नातेवाइकांची हत्या करणारा राशिद पोलीस चकमकीत ठार !

क्रिकेटपटू सुरेश रैना यांची आत्या आणि काका यांची हत्या करण्यासमवेत अन्य गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या राशिद नावाच्या आरोपीला पोलिसांनी येथे झालेल्या एका चकमकीत ठार केले.

देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र ८२४ रुग्ण आढळले

देशात दिवसभरात कोरोनाचे ३ सहस्र रुग्ण आढळले असून मागील १८४ दिवसांतील हा उच्चांक आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १८ सहस्र ३८९ एवढी झाली आहे.

देशातील हिंदू आता जागृत झाला आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई आणि ठाणे येथे २ एप्रिल या दिवशी गौरव यात्रा काढण्यात आली. दादर येथे उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.

मुंबईत येत्या १५ दिवसांत उष्णतेची लाट !

एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांमध्येच मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलणार्‍यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी यात्रेचे आयोजन ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि प्रखर हिंदुत्ववाद, म्हणजे प्रत्येक देशवासियासाठी अभिमानाची गोष्ट आहे.