अज्ञातांच्या आक्रमणात पाकचे ४ सैनिक ठार !

कराची (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तानमधील केच जिल्ह्यातील इराणच्या सीमेवर १ एप्रिल या दिवशी झालेल्या आक्रमणात पाक सैन्याचे ४ सैनिक ठार झाले.

हे आक्रमण कुणी केले ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांकडून हे आक्रमण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.