मॅक्सिकोत हवेत उडणार्‍या गरम हवेच्या फुग्याला आग : पर्यटकांनी खाली उड्या मारल्या !

दोघांचा मृत्यू

मॅक्सिको सिटी – येथील टियोतिहुआकॅन पुरातत्व स्थळाजवळ हवेत उडणार्‍या एका गरम हवेच्या फुग्याला आग आल्याने त्यातील पर्यटकांनी खाली उड्या मारल्या. यात २ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३९ वर्षीय महिला आणि एक ५० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

१ एप्रिलला घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. या दुर्घटनेत एका मुलाचा तोंडवळा पूर्णपणे भाजला असून त्याच्या उजव्या हाताला अस्थिभंग झाला आहे. या फुग्याला आग कशी लागली ?, त्यात नेमके किती पर्यटक होते ? आदी माहिती अद्याप समजू शकलेली नाही.