बंगालमध्ये भाजपच्या नेत्याची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या  

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन उडत आहेत तीन तेरा !

गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासूनच कामगारांना कामावर घ्या ! – मुख्यमंत्र्यांचे हॉटेलमालकांना निर्देश

पेडणे येथे एका हॉटेल कर्मचार्‍याने नेदरलँड येथील एका महिलेवर केलेल्या विनयभंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत.

लैंगिक अत्याचारापासून  विदेशी पर्यटकाचे रक्षण करणार्‍या व्यक्तीचा सन्मान होणार !

नेदरलँडस्थित एका पर्यटकावर लैंगिक अत्याचार होण्यापासून रोखणारे युरिको डायस यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ‘शौर्य’ पुरस्कारासाठी युरिको डायस यांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे.

तिघांना जीवदान देणार्‍या अंकुरकुमार प्रसाद याला मुख्यमंत्र्यांकडून १ लाख रुपयांचे बक्षीस

केंद्राकडे शौर्य पुरस्कारासाठी अंकुरकुमारच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी सांगितले.

कामचुकार प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाईसाठी गोवा सरकार कायद्यात सुधारणा करणार

प्रशासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करतांना प्रामाणिकपणा आणि समर्पितभाव यांनाही प्राधान्य द्यावे !

मागील १५ मासांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ८४४ महिला-मुली बेपत्ता !

मुली आणि महिला यांनी बेपत्ता होणे, हे गंभीर अन् चिंताजनक आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मुलींवर लहानपणापासूनच संस्कार करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘संयोगिताराजे छत्रपती खरे बोलत असून महंत खोटे बोलत आहेत !’ -‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर यांचे विधान

नाशिक येथील काळाराम मंदिरातील पुजार्‍यांकडून छत्रपती घराण्याचा अवमान झाल्याचे प्रकरण नाशिक – छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केलेली पोस्ट ही अपप्रवृत्तींच्या विरोधात आहे. त्यात कोणतीही चूक नाही. संयोगिताराजे छत्रपती यांचे बोलणे खरे आहे; पण महंत खोटे बोलत आहेत. महंतांना अवाजवी वक्तव्ये करून प्रकाशझोतात रहाण्याची सवय आहे’, असे वक्तव्य ‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर … Read more

पालघर किनारपट्टीवरील बोटीत पाकिस्तानी नागरिक नसल्याचे स्पष्टीकरण !

 बोटीतील १५ खलाशांच्या आधारकार्डची पडताळणी केली असून त्यात कुणीही पाकिस्तानी नागरिक नाही. याविषयीचे स्पष्टीकरण बोटीला अर्थसाहाय्य करणार्‍या ‘उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थे’ने दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांची सशर्त अनुमती !

ही सभा सायंकाळी ५ ते रात्री ९.४५ या वेळेतच घ्यावी लागेल. सभेचे ठिकाण आणि वेळेत पालट करू नये. सभेसाठी येणार्‍यांनी आक्षेपार्ह घोषणा, हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करू नये. सभेला येतांना शस्त्र बाळगू नये, अशा अटी पोलिसांनी घातल्या आहेत.

खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणी पुणे येथून एकाला अटक !

या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राहुल तळेकर या संशयित आरोपीला कह्यात घेऊन मुंबई पोलिसांकडे सोपवले आहे. खासदार राऊत यांना ‘दिल्ली में मिल, तुझे एके-४७ से उडा देंगे, सिद्धू मुसेवाला टाइप’ असा धमकीचा संदेश आला होता.