सासाराम (बिहार) येथे धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीनंतर हिंदूंचे पलायन !

सासाराम (बिहार) – श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या दंगलीनंतर येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही जणांना पलायनही केले. या भागात अद्यापही तणावाची स्थिती आहे. नालंदा येथेही अशीच स्थिती आहे. दोन्ही शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. तरीही हिंदू पलायन करत आहेत. हिंदूंचे म्हणणे आहे की, आमचे रक्षण करणारे कुणीच नाही, तर आम्ही येथे कसे राहू शकतो ?

आधी तुम्ही तुमचे प्राण वाचवा, जीव राहिला, तर अनेक घरे मिळतील ! – साहाय्य मागणार्‍या हिंदूंना पोलिसांचे उत्तर

पलायन करणार्‍या एका हिंदु महिलेने सांगितले की, प्रशासनाच्या समोरच आमच्या घरांना आगी लावण्यात आल्या. आमचे साहित्य जळून राख झाले. आम्ही पोलिसांकडे साहाय्य मागितल्यावर त्यांनी सांगितले, ‘आधी तुम्ही तुमचे प्राण वाचवा. जीव राहिला, तर अनेक घरे मिळतील.’ त्यामुळे आम्हाला पलायन करावे लागले. (हिंदूंचे रक्षण करण्याऐवजी अशा प्रकारचा सल्ला देणारे पोलीस हिंदूंनी कर भरून कशाला पोसायचे ?- संपादक)

संपादकीय भूमिका

  • बिहारमध्ये पुन्हा जंगलराज ! हिंदूंची ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता सिद्ध करते !
  • भारतात मुसलमान नाही, तर हिंदुच असुरक्षित आहेत, हेच अशा घटनांतून परत परत सिद्ध होतो ! याविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?