बालिकेवर बलात्काराच्या प्रकरणी दोघा शिक्षकांना आजन्म कारावासाची शिक्षा

आरोपी शिक्षक

कोलकाता – येथील अलीपूर येथील एका शाळेत वर्ष २०१७ मध्ये ४ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी महंमद मोफिजुल आणि अभिषेक रॉय या दोघा शिक्षकांना अलीपूर न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. यासह त्यांना ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही रक्कम पीडितेला दिली जाणार आहे.

वरील दोघा नराधम शिक्षकांनी बालिकेला शाळेतील स्वच्छतागृहात नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला होता. घटना उघड झाल्यानंतर शाळेने या दोघा शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकले होते. हा खटला लढत असतांना पीडितेच्या वडिलांची नोकरीही गेली होती. तथापि त्यांनी हार न मानता चिकाटीने लढा दिला.