ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार !

‘पुण्यभूषण फाऊंडेशन’च्या वतीने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाविषयी ज्येष्ठ अभिनेते आणि मानसोपचारतज्ञ डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

ग्रँटरोड (मुंबई) येथे ५ जणांवर चाकूंचे आक्रमण

ग्रँटरोड येथील एका इमारतीतील चेतन गाला या व्यापार्‍याने त्याच्या शेजारच्या घरातील ५ जणांवर चाकूने आक्रमण केले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. एक वयस्कर होते, तर एक महिला आहे.

(म्हणे) लव्ह जिहादवरून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे ! – अजित पवार

उत्तरप्रदेशातील कायद्याच्या धर्तीवर लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यात केला जाणार असल्याची वक्तव्ये काही लोकप्रतिनिधी करत आहेत; मात्र यातून धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही. राज्यातील जातीय सलोखा बिघडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

लोकांच्या भावना दुखावू नयेत; म्हणून कुतूबमीनार परिसरातील देवतांच्या मूर्ती नीट ठेवण्यात याव्यात !

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? पुरातत्व विभागाच्या हे का लक्षात येत नाही ? नेहमीच हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा !

छत्रपती संभाजीनगर नामांतराला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती; मात्र २४ मार्च या दिवशी न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

कत्तलीसाठी नेत असलेल्या ५८ गोवंशियांची मुक्तता, २४ आरोपींना अटक !

छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भ येथून कत्तलीसाठी गोवंशियांची खरेदी करून, भाग्यनगर (हैद्राबाद) येथे नेली जात असतांना यवतमाळ जिल्ह्यातील मनदेवजवळ सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना पकडले. ६१ पैकी ५८ गोवंशियांना मुक्त केले.

सोलापूर येथे अनुमतीविना झाडे तोडल्याने अधिकार्‍याला ५ लाख रुपये दंड !

शहरातील नेहरूनगर येथील शासकीय मैदानावर असलेली ५ झाडे महापालिकेची अनुमती न घेता तोडल्याविषयी पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव यांना प्रत्येकी १ वृक्ष १ लाख रुपये यानुसार ५ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.

हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरची हिंदु पंचांग दिनदर्शिका

हिंदु धर्म संस्कृती आणि परंपरा जतन करणारी, नाविन्यपूर्ण हिंदु कालगणना असणार्‍या या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा चैत्र शुक्ल पंचमी (रविवार, २६ मार्च २०२३) या दिवशी येथील महात्मा बसवेश्वर सदनात सायंकाळी ७ वाजता होणार आहे.

भरणे (खेड) येथे सापडले ८३ गावठी बाँब

तालुक्यातील भरणे येथे एका घरामध्ये ८३ जीवंत गावठी बाँब सापडले असून पोलिसांनी कल्पेश जाधव या संशयिताला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. ही कारवाई साहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ मार्चच्या सायंकाळी करण्यात आली.