ग्रँटरोड (मुंबई) येथे ५ जणांवर चाकूंचे आक्रमण

असुरक्षित मुंबई शहर !

मुंबई – ग्रँटरोड येथील एका इमारतीतील चेतन गाला या व्यापार्‍याने त्याच्या शेजारच्या घरातील ५ जणांवर चाकूने आक्रमण केले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. एक वयस्कर होते, तर एक महिला आहे. अन्य ३ जणांवर रिलायन्स रुग्णालयात उपचार चालू आहेत. २४ मार्च या दिवशी ही घटना घडली.

माझ्या परिवाराला हे माझ्याविषयी भडकवत होते, असे चेतन या तरुणाने सांगितले. चेतन गाला हा गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेला नाही. त्याने हे निर्घृण आक्रमण केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक जण हे दृश्य पहात होते; पण परिस्थिती एवढी गंभीर होती की, त्यांना वाचवायला कुणी पुढे जाऊ शकले नाही.