कत्तलीसाठी नेत असलेल्या ५८ गोवंशियांची मुक्तता, २४ आरोपींना अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

यवतमाळ, २४ मार्च (वार्ता.) – छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भ येथून कत्तलीसाठी गोवंशियांची खरेदी करून, भाग्यनगर (हैद्राबाद) येथे नेली जात असतांना यवतमाळ जिल्ह्यातील मनदेवजवळ सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना पकडले. ६१ पैकी ५८ गोवंशियांना मुक्त केले. तथापि ३ गोवंशियांचा गुदमरून मृत्यू झाला होता. ८ वाहन कह्यात घेऊन २४ आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्ह्यातील गोवंशप्रेमींकडून कौतुक होत आहे.

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही आरोपी अशी कृत्ये करतात, यावरून त्यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही, हे लक्षात येते !

पोलिसांनो, एका कामगिरीने सुखावून न जाता सर्वत्रच्या गोवंशियांचे रक्षण होण्यासाठी प्रयत्न करा !