हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरची हिंदु पंचांग दिनदर्शिका

लांजा येथे उद्या होणार दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा

लांजा, २४ मार्च (वार्ता.) – राजापूर तालुक्यातील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानकडून  हिंदु नववर्षाच्या निमित्ताने हिंदु पंचांग दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. हिंदु धर्म संस्कृती आणि परंपरा जतन करणारी, नाविन्यपूर्ण हिंदु कालगणना असणार्‍या या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा चैत्र शुक्ल पंचमी (रविवार, २६ मार्च २०२३) या दिवशी येथील महात्मा बसवेश्वर सदनात सायंकाळी ७ वाजता होणार आहे.

या प्रसंगी सनातन संस्थेच्या पू. माया गोखले, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. दादा रणदिवे, वीरशैव समाज लिंगायत स्वामी मठाचे श्री. लक्ष्मण गंगाधर स्वामी, ज्योतिषी श्री. सुनील बंडू जंगम स्वामी, विश्व हिंदु परिषदेचे रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याचे सहमंत्री श्री. कुमार जोगळेकर आणि श्री. अशोक पाखरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत.  या कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात आले आहे.