सोलापूर – अक्कलकोट रस्ता एम्.आय.डी.सी. येथे स्वतंत्र अग्नीशमन केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली. पाण्याच्या टाक्यांजवळ साडेचार सहस्र चौरस फूट जागेची पहाणी करण्यात आली. महापालिका आणि एम्.आय.डी.सी.ने संयुक्त पहाणी करून त्याचा अहवाल औद्योगिक महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पुणे विभाग) यांच्याकडे पाठवला आहे. (आगीच्या घटना वाढल्यानंतर जागे होणारे महापालिका प्रशासन ! – संपादक)
शहरामध्ये १ मासात आग लागण्याच्या ८ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अनुमाने ५० कोटी रुपयांची हानी झाली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये आग लागल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी स्वतंत्र अग्नीशमन केंद्र नाही. त्यामुळे बंब घटनास्थळी पोचेपर्यंत मालमत्तेची मोठी हानी होते. ‘औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात अग्नीशमन केंद्र असायला हवे’, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.